भावाला भेटायला जाणाऱ्या बहिणीचा रेल्वे अपघातात मृत्यू

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालघर स्टेशनवरुन सूरत विरार शटल पकडताना एका महिलेचा पाय घसरल्याने ती प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यातील गॅपमध्ये पडली. या घटनेचा धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तुली विश्र्वकर्मा (४२) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

तुली पती मिशेल, व २ मुलांसोबत विरारला आपल्या भावाला भेटण्यासाठी जात होत्या. सूरत विरार शटल पकडण्यासाठी त्या पालघर स्टेशनवर उभ्या होत्या. गाडी येताच सगळीकडे एकच धावपळ झाली. या ग़डबडीत मिशेल दुसऱ्या डब्यात चढले. तर तुली व मुले प्लॅटफॉर्मवरच राहीली. यामुळे तुली यांनी आधी मुलांना डब्यात चढण्यास सांगितले व त्या त्यांच्या पाठीमागे डब्यात चढत होत्या. पण त्याचवेळी गाडी सुरू झाली. यामुळे तुली हादरल्या यात त्यांचा पाय घसरला व त्या थेट प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यातील गॅपमध्ये पडल्या. हे पाहताच त्याच्या मुलांनी व प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या लोकांनी एकच आरडाओरडा केला. एका प्रवाशाने साखळी ओढली. मोटरमन लगेचच गाडी थांबवली. त्यानंतर तुली यांना बाहेर काढण्यात आले व तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.