प्रवासादरम्यान महिलेला आली पाळी, रेल्वे प्रशासनाने तत्काळ पाठवली सॅनिटरी नॅपकीन

1

सामना ऑनलाईन । बेंगरुळू

हिंदुस्थानी रेल्वेने आपली सेवा अधिक चांगली केली आहे, त्याचे उदाहरण म्हणजे बेंगरूळूचे. बेंगरूंळूत एका महिलेला प्रवासादरम्यान पाळी आली. तेव्हा तिच्या मित्राने रेल्वेला एक ट्विट केले. त्यावर रेल्वे प्रशासनाने दखल घेत तिला सॅनिटरी नॅपकीन आणि औषधांची सोय करून दिली.

१३ जानेवारी रोजी विशाल खानापुरे हे आपल्या साथीदारांसह बेंगरुळूहून होसपेटे जंक्शनला जात होते. तेव्हा प्रवासादरम्यान त्यांच्या महिला साथीदाराला मासिक पाळी सुरू झाली. आणि नेमक्या वेळी त्यांच्याकडे सॅनिटरी नॅपकीन नव्हती. तेव्हा विशाल यांनी रेल्वे प्रशासनाला ट्विट करून मदतीचे आवाहन्केले. तेव्हा रेल्वे प्रशासनाने दखल घेत त्याला उत्तर दिले व तत्काळ महिलेला सॅनिटरी नॅपकीन आणि औषधं त्यांना उपलब्ध करून दिली.