बिनपैशाचा तमाशा! एक्झॉस्ट पाईपमध्ये डोकं घुसवलं, तरुणीची बोंबाबोब

81

सामना ऑनलाईन, मिनसोटा

गाण्यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका तरुणीमुळे इतरांना बिनपैशाचा तमाशा बघायला मिळाला. बेफाम दारु प्यायल्यानंतर या तरुणीला काय झटका आला कोणास ठाऊक तिने पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाडीच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये डोकं घुसवलं. थोडावेळ या तरुणीला मजा आली, नंतर तिने डोकं काढायचा प्रयत्न केला तर ते निघेना. या पाईपमध्ये तिचं डोकं इतकं जाम  झालं की ते काही केल्या निघेना. तिने तिच्या मित्र मैत्रिणींना बोलावून घेतलं. या सगळ्यांनी तिचे पाय ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हे प्रयत्नही निष्फळ ठरले.

अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावावं लागलं. या जवानांनी देखील ओढाओढी करून बघितली मात्र ती अयशस्वी झाल्याने त्यांनी कटरच्या सहाय्याने तो पाईप कापला आणि नंतर या तरुणीचं डोकं त्यातून बाहेर काढलं. या तरुणीने पाईपमध्ये डोकं का घातलं हे अद्याप कळू शकलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या