अभद्र प्रश्न विचारणाऱ्या वकिलाला महिलांनी धू-धू धुतला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यात काही महिलांनी एका वकिलाला न्यायालयाच्या आवारातच चपला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांना अभद्र भाषेत प्रश्न विचारणे या वकिलाला महागात पडले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

गुना जिल्ह्यातील सत्र न्यायालयातील वकिलावर महिलांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये महिला वकिलाला मारहाण करताना दिसत आहे. महिला वकिलाला मारहाण करताना तेथे उभ्या असलेल्या नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. वकिल महिलांच्या हातापाया पडताना दिसत आहे, मात्र विनवणी करणाऱ्या वकिलाला महिलांनी मारहाण करत न्यायालयात नेले. मात्र वकिलाविरोधात महिलांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली की नाही, याची माहिती मिळालेली नाही.

  • Arvind Chitale

    I do not support this but this is a signal to lawyers to cross exam. sensibly.