लोकसभा निवडणुकीत 13 राज्यात पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक

20

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी अंतिम टप्प्यासाठी मतदान पार पडले. या वेळी देशातील 13 राज्यांत पुरुषांपेक्षा जास्त महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 2014 साली 11 राज्यात हे प्रमाण जास्त होते. तेव्हा आंध्र प्रदेशचे विभाजन झाले नव्हते. परंतु मतदान संयुक्त राज्यातच झाले होते. आताही तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला आहे.

सर्व प्रथम केरळ राज्याचा क्रमांक लागतो. 2014 साली केरळमध्ये 97 लाख महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावल होता. यंदा 1 कोटी 6 लाख महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तमिळनाडूत गेल्यावेळी 2 कोटी 7 लाख महिलांनी मतदान  केले होते यावेळी 2 कोटी 13 लाख महिलांनी मतदान केले आहे. आंध्र प्रदेशमध्ये यंदा महिला मतदाराचे प्रमाण 3 लाख 27 हजारांनी वाढले आहे. आंध्र प्रदेश नंतर बिहार, मणिपूर, मेघालय, पुद्दुचेरी, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोरम, दमण दीव आणि लक्षद्वीपचा क्रमांक लागतो.

बिहारमधील आकडा हा सहा टप्प्यांपर्यंतचा आहे. असे असले 2014 च्या तुलनेत यंदा 1 लाख 28 हजार अधिक महिलांनी मतदान केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या