महिलांना असतं एक चतुर्थांशच डोकं..सौदीच्या मौलवीने तोडले अकलेचे तारे

सामना ऑनलाईन। रियाध

महिला ड्रायव्हिंग करू शकत नाहीत, कारण त्यांना फक्त एक चतुर्थांशच डोकं असतं, असं वादग्रस्त विधान करून सौदी अरेबियाच्या एका मौलवीने अकलेचे तारे तोडले आहेत. शेख साद अस हजारी असं या मौलवीचं नाव असून महिलांवर टीप्पणी करत असतानाचा त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत मौलवी पुरूषाच्या तुलनेत महिलांना अर्धच डोकं असतं, असं बोलत असल्याचं दिसत आहे. एवढ्यावरच हा मौलवी थांबला नसून शॉपिंगला गेल्यावर महिलांचं डोक अजूनच कमी होतं. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त एक चतुर्थांश डोकं उरतं. महिलांना अशाचप्रकारे घडवण्यात आलं आहे. यामुळे सौदीतील रस्ते व ट्रॅफिक पाहता महिलांना गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य आणि लायसन्स देता कामा नये. जोपर्यंत महिला कट्टर मुसलमान आहे, तोपर्यंत तिच्याकडून नुकसान होण्याच तसं कारण नाही, असंही या मौलवीनं म्हटलं आहे.

मौलवीच्या या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून जर पुरूषांना अर्धेच डोक आहे हे रस्ते सुरक्षा विभागाला कळलं तर ते पुरूषांना ड्रायव्हिंग लायसन्स कसे देणार, असा सवालही काहींनी केला आहे. सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंग करण्यास बंदी आहे. याला अनेक महिलांचा विरोध आहे. अनेक महिला संघटनांनी याविरोधात आंदोलनंही केली होती.