युवा ऑलिम्पिक; महिला हॉकी संघाची विजयी हॅटट्रिक


सामना ऑनलाईन। ब्यूनस आयर्स

अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने विजयाची हॅटट्रिक साजरी केली. हिंदुस्थानने फाइव्ह ए साइड लढतीत वानूआतू संघाचा 16-0 गोल फरकाने धुव्वा उडवला. या एकतर्फी लढतीत हिंदुस्थानकडून आघाडीच्या फळीतील मुमताज खानने (8 व्या, 11 व्या, 12 व्या व 15 व्या मिनिटाला) चार गोल केले. चेतनानेही तीन गोल करून मुमताजला साथ दिली.