हुंडाविरोधी लढ्यासाठी तरूणींनी खंबीर पाऊल उचललंच पाहीजे

13


<<अॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या>>

‘हुंडा देणार नाही’ असे म्हणणाऱ्या मुली आहेत. पण मी जेव्हा हुंडा देणार नाही असे म्हणते, तेव्हा कायद्यानुसार प्रॉपर्टीमध्ये असलेला हक्क मुली सहज विसरतात. त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी आग्रह धरला पाहिजे. पतीने पत्नीला जमीन, घर, स्थावर मालमत्तेमध्ये हक्क दिलाच पाहिजे. एकदा मधू दंडवते म्हणाले होते, लग्नांमधून खरा ‘ब्लॅक मनी बाहेर येतो’, मराठवाडय़ातील मोठय़ा राजकीय मंडळींनी अलीकडे आपल्या मुलांच्या लग्नावर केलेला कोटय़ावधी रुपयांचा खर्च हा प्रतिष्ठsचा मानला जातो. अशी हिडीस लग्नं करणाऱयांच्या खर्चाचे स्त्रोत शोधून त्यांच्या संपूर्ण खर्चावर कर बसवला पाहिजे. मॅरेज इकोनॉमीतून होणाऱया एकंदरीत उलाढालीवर इन्कम टॅक्स विभागाने खर्चाचा तपशील मागविला पाहिजे. मुलाकडच्या नातलग महिलांवर लाखो रुपये खर्चून त्यांचे चेहरे रंगविणाऱ्या पार्लरचे रेकॉर्ड मागविले पाहिजेत. हे सर्व होत असताना ‘मुलगी नको’ ही आई-वडिलांची मानसिकता बदलली पाहिजे. तिला पुढे द्याव्या लागणाऱ्या हुंडय़ाच्या भितीने स्त्रीभृणहत्येचा जन्म झाला. हे थांबले पाहिजे.

मूळात शितल वायाळ हिला हुंडय़ासाठी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या मुलासह त्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्या मुलाला अजून शोधून काढले जात नाही, हा कसला प्रकार आहे. जागतिक महिला दिन हा महिलांनी नाही, तर पुरूषांनी साजरे केले पाहिजे. ते करताना १८ वर्षाखाली मुलीशी मी लग्न करणार नाही, हुंडा घेणार नाही, तरच समाजातील परिस्थिती बदलेल. समाजात मिरावणाऱ्या पुढाऱ्यांनी खर्चिक विवाहाचे मॉडेल आता बंद करावेत. साध्या लग्नांना प्रतिष्ठा निर्माण झाली म्हणजे हुंडाबळी अटोक्यात येईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या