चिपळूण-संगमेश्वरमधील १२ रस्त्यांना मंजूरी

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील १२ रस्त्यांना नुकतीच मंजूरी मिळाली आहे. सुमारे ८५,१०० किंलोमीटर लांबीच्या या रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण, साईडपट्ट्यांची कामे, रस्त्यावरील मोऱ्यांचे नुतनीकंरण या कामातून करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली़.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रत्नागिरी जिल्हा समितीची मंत्रालय मुंबई येथे पालकंमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, आमदार राजन साळवी, अधिक्षक अभियंता ग़ोसावी, सदस्य सचिव मुळे, उपअभियंता कुंभार व अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते़