World cup 2019 LIVE : कांगारू विजयी ट्रॅकवर, पाकिस्तानचा पराभव

23

सामना ऑनलाईन । लंडन

पाच वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलिया आणि 1992 चा विजेता पाकिस्तान संघात क्रिकेट वर्ल्डकपमधील सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 41 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 308 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 266 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलिया कडून कमिन्सने सर्वाधिक 3, रिचर्डसन आणि स्टार्कने प्रत्येकी 2, फिंच व कुलटर नाईलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

त्याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 307 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हीड वॉर्नरने 107 धावांची शतकी खेळी केली आणि फिंचने 82 धावांचे योगदान दिले. तर पाकिस्ताकडून मोहम्मद आमिरने सर्वाधिक 5 बळी घेतले.

पाहा लाईव्ह अपडेट –

 • पाकिस्तानचा शेवटचा खेळाडू बाद, ऑस्ट्रेलिया विजयी
 • पाकिस्तानला लागोपाठ 2 धक्के
 • 42 चेंडूत 51 धावांची गरज

 • पाकिस्तानच्या 250 धावा पूर्ण
 • दोघांमध्ये 50 धावांची भागिदारी
 • सामना रोमहर्षक स्थितीत, सरफराज-वहाब लढवतोय खिंड
 • पाकिस्तानला 72 चेंडूत 91 धावांची गरज, तीन खेळाडू शिल्लक
 • पाकिस्तानच्या 200 धावा पूर्ण
 • पाकिस्तानचा सातवा खेळाडू बाद
 • 30 षटकानंतर पाकिस्तानच्या 6 बाद 160 धावा
 • पाकिस्तानला सहावा धक्का

 • पाकिस्तानच्या 150 धावा पूर्ण
 • कमिन्सने घेतला तिसरा बळी
 • पाकिस्तानचा डाव घसरला, लागोपाठ तीन खेळाडू बाद

 • 20 षटकानंतर पाकिस्तानच्या 2 बाद 110 धावा
 • पाकिस्तानच्या 100 धावा पूर्ण
 • 15 षटकानंतर पाकिस्तानच्या 2 बाद 74 धावा
 • बाबर आझम 30 धावांवर बाद
 • पाकिस्तानचा दुसरा खेळाडू बाद

 • पाकिस्तानच्या 50 धावा पूर्ण
 • 10 षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 51 धावा
 • बाबर आझमचा चौकारांचा पाऊस, पाच चौकारांनी काढली सिंगल
 • पाच षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 30 धावा
 • फखर जमान शून्यावर बाद
 • पाकिस्तानची खराब सुरुवात

 • ऑस्ट्रेलियायाचे पाकिस्तानसमोर 308 धावांचे आव्हान
 • 49 षटकात ऑस्ट्रेलिया सर्व बाद 307 धावा

 • ऑस्ट्रेलियाचा शेवटचा खेळाडू बाद
 • ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळवा, नववा धक्का
 • ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळवा, आठवा धक्का
 • ऑस्ट्रेलियाच्या 300 धावा पूर्ण
 • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का,  कुल्टर-नाईल बाद
 • 45 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 291 धावा
 • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, मार्श बाद
 • 40 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 256 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण
 • शतकानंतर 107 धावांवर वॉर्नर बाद
 • एक दिवसीय कारकीर्दीतील 15 वे शतक
 • वॉर्नरचे दणदणीत शतक

 • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
 • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, स्मिथ बाद
 • 25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 165 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
 • फिंचचे शतक हुकले, 82 धावांवर बाद
 • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच बाद

 • डेव्हीड वॉर्नरचे सलग तिसरे अर्धशतक
 • 20 षटकानंतर बिनबाद 122 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण
 • कर्णधार फिंचचे अर्धशतक

 • 15 षटकानंतर बिनबाद 87 धावा
 • दहा षटकानंतर बिनबाद 56 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 50 धावा पूर्ण
 • पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 27 धावा
 • दोन षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 7 धावा
 • डेव्हीड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच मैदानात
 • पाच वर्षातील दोन्ही संघाची कामगिरी –
  एकूण लढती – 14
  ऑस्ट्रेलिया विजयी – 13
  पाकिस्तान विजयी – 1
 • गेल्या पाच वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्घ पाकिस्तान फक्त एक सामना जिंकू शकला आहे.
 • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आपली प्रतिक्रिया द्या