वर्ल्ड कपचे पडघम; दिमुथ करुणारत्नेकडे नेतृत्व

5

सामना ऑनलाईन, कोलंबो

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून गुरुवारी इंग्लंडमधील वर्ल्ड कपसाठी लंकन संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी या संघामध्ये अनुभवी दिनेश चंडीमल, निरोशन डिकवेला, अकिला धनंजया, दनुष्का गुणथिलका व उपुल थरंगा यांना संघात संधी देण्यात आलेली नाही. दिमुथ करुणारत्नेकडे नेतृत्व सोपवण्यात आले असून या संघामध्ये लहिरू थिरीमाने, जेफ्री वॅण्डरसे व मिलिंदा सिरीवरदना यांची अंतिम 15मध्ये निवड करण्यात आली आहे. निवड समिती प्रमुख अशंथा डी मेल यांच्या अधिपत्याखाली ही निवड करण्यात आली आहे.

श्रीलंकेचा संघ खालीलप्रमाणे

दिमुथ करूणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लहिरू थिरीमाने, कुशल मेंडिस, कुशल परेरा, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डिसिल्व्हा, थिसारा परेरा, आयसुरू उदाना, जेफ्री वॅण्डरसे, जीवन मेंडिस, मिलींदा सीरीवरदना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुआन प्रदीप.

पाकिस्तानी संघाचीही घोषणा, मोहम्मद आमीरला वगळले

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचीही घोषणा गुरुवारी करण्यात आली. या संघातून तेज गोलंदाज मोहम्मद आमीरला वगळण्यात आले आहे. सरफराज अहमद या संघाचे कर्णधारपद भूषवेल. शोएब मलिक व मोहम्मद हाफीज या अनुभवी खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे.