#WorldCup2019 हिंदुस्थानचा संघ जाहीर, वाचा कधी आहेत हिंदुस्थानचे सामने


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे ते 14 जुलै या दरम्यान होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर मुंबईकर रोहित शर्मा उपकर्णधार आहे.

दोन वेळेसची वर्ल्ड कप विजेता हिंदुस्थानची पहिली लढत 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर संपूर्ण जगात लक्षवेधी ठरणारी हिंदुस्थान-पाकिस्तान लढत 16 जून रोजी मँचेस्टरच्या मैदानात होणार आहे. 2019 च्या विश्वचषकाचे सामने 1992 च्या वर्ल्ड कप प्रमाणे राऊंड रॉबीन पद्धतीने होणार असून यामध्ये सर्व संघ एकमेकांशी एक सामना खेळणार आहेत. साखळी गटातील चार अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील.

हिंदुस्थानचे वेळापत्रक

हिंदुस्थान वि. दक्षिण आफ्रिका – 5 जून

हिंदुस्थान वि. ऑस्ट्रेलिया – 9 जून

हिंदुस्थान वि. न्यूझीलंड – 13 जून

हिंदुस्थान वि. पाकिस्तान – 16 जून

हिंदुस्थान वि. अफगानिस्तान – 22 जून

हिंदुस्थान वि. वेस्ट इंडिज – 27 जून

हिंदुस्थान वि. इंग्लंड – 30 जून

हिंदुस्थान वि. बांगलादेश – 2 जुलै

हिंदुस्थान वि. श्रीलंका – 6 जुलै

दरम्यान, 9 जुलैला पहिला उपांत्या सामना मँचेस्टरच्या ओल्ट ट्रॅफर्ड मैदानावर होईल, तर दुसरा उपांत्या सामना बर्मिंघहॅमच्या एजबस्टन मैदानात रंगणार आहे, त्यानंतर 14 जुलैला या महासंग्रामाचा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी लॉर्डसच्या मैदानावर रंगेल.

विश्वचषकासाठी असा असेल हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जयप्रती बुमराह, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी.