ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये ‘एन्ट्री’, पण ड्रेसिंग रुममध्ये ‘नो एन्ट्री’

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये शिखर धवन जायबंदी झाल्याने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला बोलावण्यात आले. शिखर धवन उर्वरित वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही हे अद्याप निश्चित झाले नसल्याने पंतला अद्याप ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री मिळालेली नाही. त्यामुळे तो संघासोबत प्रवासही करू शकणार नाही.

धवन लवकर पुनरागमन करणार, प्रशिक्षकांनी दिले शुभ संकेत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत एक उसळता चेंडू शिखर धवनच्या बोटावर आदळला होता. त्यावेळी मैदानावर त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते आणि त्याने या लढतीत शतकही झळकावले. परंतु शिखर त्या लढतीत क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याची दुखापत गंभीर असून तीन आठवड्यांची विश्रांती सांगितल्याची बातमी आल्याने टीम इंडियाला धक्का बसला. शिखरला पर्याय म्हणून तत्काळ ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आले.

ऋषभ पंत इंग्लंडमध्ये पोहोचला असून 16 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या हाय व्होल्टेज लढतीपूर्वी मॅनचेस्टरला संघासोबत असेल. या संदर्भात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘शिखरला पर्याय म्हणून संघ व्यवस्थापकाने पंतला बोलावले आहे. तसेच पंत मॅनचेस्टरला असेल परंतु त्याला ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश मिळणार नाही. आयसीसीच्या आचारसंहितेनुसार फक्त वर्ल्डकपसाठी निवड झालेले खेळाडूच त्यांच्यासोबत प्रवास करू शकतात आणि ड्रेसिंग रुममध्ये जाऊ शकतात.’

आपली प्रतिक्रिया द्या