दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर,फाफ डय़ुप्लेसिसकडे कर्णधारपद

6

सामना ऑनलाईन,जोहान्सबर्ग

वन डे क्रिकेटमध्ये गेल्या 16 डावांमध्ये फक्त एक शतक झळकावणाऱ्या हाशीम अमलाचे वर्ल्ड कपचे तिकीट बुक झाले आहे. दक्षिण आफ्रिकन बोर्ड व निवड समितीकडून गुरुवारी याची घोषणा करण्यात आली. अनुभवी हाशीम अमलावर विश्वास दाखवण्यात आला असून फाफ डय़ुप्लेसिस संघाचा कर्णधार असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ खालीलप्रमाणे

फाफ डय़ुप्लेसिस (कर्णधार), क्विण्टॉन डी कॉक, हाशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी डय़ुमिनी, एडन मार्करम, रॅसी वॅनडर डय़ुसेन, ड्वेन प्रिटोरियस, आंदिल पेहलुकवायो, कॅगिसो रबाडा, डेल स्टेन, लुंगी एनगिडी, एनरीच नॉर्टजे, इम्रान ताहीर, तबरेज शम्सी.

2015तील सात खेळाडू कायम

द. आफ्रिकेच्या चमूत मागील वर्ल्ड कपचे सात खेळाडू कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये फाफ डय़ुप्लेसिस, हाशीम अमला, क्विण्टॉन डी कॉक, डेव्हिड मिलर, जे. पी. डय़ुमिनी, डेल स्टेन व इम्रान ताहीर यांचा समावेश आहे.