जगातील महाकाय विमानाची उड्डाण चाचणी यशस्वी


सामना ऑनलाईन। कॅलिफोर्निया

कॅलिफोर्निया येथे करण्यात आलेल्या जगातील महाकाय विमानाची उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. या विमानात सहा बोईंग 747 इंजिन बसवण्यात आले आहेत. अंतराळात रॉकेट नेण्याची आणि 35 हजार फूट उंचावरून रॉकेटचे प्रक्षेपण करण्याची क्षमता या विमानात आहे. शनिवारी या विमानाने मोजावे वाळवंटावरून उड्डाण केले. स्ट्रॅटोलॉन्च असे या विमानाला नाव देण्यात आले आहे.

अंतराळात रॉकेट नेण्यासाठी या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. या विमानातून प्रक्षेपण करण्यात आलेले रॉकेट उपग्रह व त्यांच्या कक्षेपर्यंत पोहचू शकणार आहे. स्केल्ड कम्पोजिट्स नावाच्या एका इंजीनियरिंग कंपनीने हे विमान तयार केले आहे. या विमानाच्या पंखाचे आकारमान एखाद्या फुटबॉल मैदानाएवढे आहे. शनिवारी अडीच तास हे विमान आकाशात होते. या विमानाची उड्डाण क्षमता 304 किमी ताशी आहे. या विमानात एकाच वेळी तीन रॉकेट ठेवता येणे शक्य आहे. स्ट्रॅटोलॉन्चला 2011 साली मायक्रोसॉफ्टचे दिवंगत सहसंस्थापक पॉल जी एलेन यांनी तयार केले होते. पण 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.