‘हा’ आहे जगातील सर्वात आळशी देश, हिंदुस्थानचा कितवा नंबर?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) जगातील सर्वात आळशी देशांची यादी जाहीर केली आहे. डब्लूएचओने जाहीर केलेल्या या यादीनुसार, जगातील प्रत्येक चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती नियमित व्यायम करत नाही. डब्लूएचओने जगातील 168 देशांमध्ये सर्व्हे केला असून यात युगांडा हा देश सर्वोधिक उत्साहपूर्ण देश आहे. तर कुवैत सर्वात आळशी देश आहे. डब्लूएचओने अशा लोकांचा सर्व्हे केला आहे जे नियमित 75 व्या मिनिटं आणि आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम करतात.

हिंदुस्थानचा कितव्या स्थानी…
डब्लूएचओच्या सर्व्हेनुसार अमेरिका 143 व्या, यूके 123 व्या, फिलिपिन्स 141 व्या, ब्राझिल 164 व्या आणि सिंगापूर 126 व्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा 97 वा नंबर आहे. या यादीमध्ये हिंदुस्थानचा नंबर 117 वा आहे.

रिपोर्टनुसार, कुवैत, अमेरिका, सौदी अरब आणि इराकमधील निम्म्यापेक्षा जास्त लोकं नियमित व्यायाम करत नाहीत. या तुलनेमध्ये युगांडातील फक्त 5.5 टक्के व्यायाम करत नाहीत. यावरून दिसून येते की येथील लोकं व्यायाम आणि चांगल्या आरोग्यासाठी किती जागरूक आहेत.

डब्लूएचओच्या रिपोर्टनुसार, अनेक देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक सक्रीय असतात. याच सर्व्हेनुसार गरीब आणि अविकसीत देशातील लोकं विकसीत आणि श्रीमंत देशातील लोकांपेक्षा दुप्पट व्यायाम करतात.