प्रजननासाठी एकत्र आलेल्या वाघाच्या हल्ल्यात वाघिणीचा मृत्यू

10


सामना ऑनलाईन। लंडन

लंडनमधील एका प्राणी संग्रहालयात विचित्र घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथे प्रजननासाठी वाघिणीच्या पिंजऱ्यात सोडण्यात आलेल्या वाघाने वाघिणीवरच हल्ला करून तिला ठार केले आहे. असीम असे या वाघाचे नाव असून मेलिता असे वाघिणीचे नाव होते. प्रजननासाठी एकत्र आलेले प्राणी हिंसक होऊन त्यांनी दुसऱ्या साथीदाराचा जीव घेण्याची ही जगातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे या दोघांना एकत्र आणण्याआधी 10 दिवस वेगळे ठेवण्यात आले होते. असीमला सुमात्राहून आणण्यात आले होते. तसेच दोघांची प्रजननासाठी आवश्यक मानसिकतेचीही चाचणी करण्यात आली होती. त्यातून सकारात्मक निकाल आल्यानंतरच असीमला मेलिताच्या पिंजऱ्यात सोडण्यात आले होते. पण तरीही असीमने मेलिताला ठार केल्याने प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या