जगातील सर्वात लहान बाळ; हाताच्या पंजाएवढाच आहे आकार

13

सामना ऑनलाईन । टोकियो

आतापर्यंत जगभरात अनेक प्रिमॅच्युअर मुलांच्या जन्म झाला आहे. मात्र, जपानची राजधानी टोकियोमध्ये फक्त हाताच्या पंजाएवढ्या आकाराच्या बाळाचा जन्म झाला आहे. हे बाळ सहज हाताच्या ओंजळीत मावते. जन्मावेळी या बाळाचे वजन फक्त 268 ग्रॅम एवढेच होते. काही वैद्यकीय कारणांमुळे फक्त 24 आठवड्यात या बाळाचा जन्म झाला आहे. टोकियोतील कियो युनव्हर्सिटीच्या रुग्णालयाता या प्रिमॅच्युअर बाळाचा जन्म झाला आहे.

गर्भावस्थेदरम्यान या बाळाची वाढ होणे अचानक थांबले. बाळाची वाढ होत नसल्याने त्याच्या जीवाला धोका होता. त्यामुळे गर्भावस्था पूर्ण होण्यापूर्वीच शस्त्रक्रिया करून बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यामुळे फक्त 24 आठवडे झालेल्या या बाळाचा कियो रुग्णालयात जन्म झाला. जन्मानंतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने बाळाची विशेष काळजी घेतली. बाळाचा श्वासोश्वास आणि त्याचे वजन यावर विशेष लक्ष देण्यात आले. सुमारे पाच महिने बाळाला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील इंटेसिव्ह केअर नसर्सरीमध्ये बाळावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर बाळाचे वजन 3.32 किलोग्रॅम झाल्यावर त्याला घरी पाठवण्यात आले. आता बाळाची तब्येत चागंली असून त्याला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

युनिव्हर्सिटी ऑफ लोवाच्या टाइनिएस्ट बेबी रजिस्ट्रीमध्ये 2009 मध्ये जर्मनीत जगातील सर्वात कमी वजनाच्या बाळाचा जन्म झाला होता. जन्मावेळी त्याचे वजन फक्त 274 ग्रॅम होते. मात्र, यावर्षी जपानच्या टोकियोमध्ये जन्म झालेल्या या बाळाचे वजन फक्त 268 ग्रॅम होते. त्यामुळे जगातील सर्वात लहान आकाराचे आणि कमी वजनाचे बाळ म्हणून जपानमधील या बाळाची नोंद झाली आहे.