विमानाची ईमर्जन्सी लॅन्डींग; पायलट म्हणाला बसने जा!

सामना ऑनलाईन । लाहोर

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या एका विमानाचं शनिवारी लाहोरमध्ये ईमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवास तुम्ही बसने करा असे सांगितले गेले. संतप्त प्रवाशांनी असे करण्यास नकार देताच विमानातील एसी बंद करण्यात आले आणि आता विमान पुढे जाणे शक्य नाही त्यामुळे तुम्हाला पुढील प्रवास बसनेच करावा लागेल असे सांगण्यात आले. धुक्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे अबूधाबीवरून रहीम यार खान एअरपोर्टला जाणाऱ्या या विमानाचे ईमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आले होते.

पाकिस्तानमधील ‘जियो न्यूज’ने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार, PIA एअरलाईन्सचे विमान यूएईच्या अबूधाबीवरून रहीम यार खान एअरपोर्टला जाण्यासाठी रवाना झाले होते. परंतु, वातवरणात धुक्याचे प्रमाण अधिक कारणाने अचानक लॅन्डींग करण्यात आले. त्यानंतर एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना रहीम यार खान एअरपोर्टपर्यंत बसने जाण्यास सांगितले. प्रवाशांनी बसने जाण्यास नकार दिला आणि त्यांनी विमानातून उतरण्यासही नकार दिला. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यानंतर विमानातील एसी बंद केले गेले त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

लाहोरपासून रहीम यार खान एअरपोर्टपर्यंतचे अंतर ६२४.५ किलोमीटर आहे. प्रवाशांनी सांगितल्यानुसार, त्यांनी एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याकडे विनंती केली होती की त्यांना मुलतान एयरपोर्टपर्यंत बसने सोडण्यात यावे. ज्याचे अंतर रहीम यार खान एअरपोर्टपासून २२९ किलोमीटर लांब आहे.