मराठीत लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला 10 टक्के वाटा


सामना ऑनलाईन । मुंबई

‘नटसम्राट’ आणि ‘व्हॉट्सअॅप लग्न’ या यशस्वी सिनेमांची निर्मिती करणारी विश्वास जोशी यांची फिनक्राफ्ट मीडिया अँड एंटरटेनमेंट ही निर्मिती संस्था त्यांच्या तिसऱ्या सिनेमाची तय्यारी करत असून, त्याच टायटल आहे ‘घ्ये डबल!’ विल्यम शेक्सपियरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ ह्या नाटकावर आधारित हा सिनेमा असून याचे दिग्दर्शन विश्वास जोशी व लेखन हृषिकेश कोळी याचे आहे. सध्या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरू असून याचे संवादही हृषिकेशच लिहितोय. शेक्सपियरवरच्या लिखाणावर होऊ घातलेला मराठीतील हा पहिलाच सिनेमा आणि तोही कॉमेडी!

या सिनेमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ह्या सिनेमासाठी लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला 10 टक्के वाटा मिळणार आहे.भविष्यात जर हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या भाषेत तयार झाला तर त्या चित्रपटातच्या नफ्यातला 10% वाटा हृषिकेशला मिळणार आहे. विश्वास जोशी ह्यांनी निर्माता म्हणून उचललेलं हे पाऊल भविष्यात लेखकांच्या करारामधील टर्निंग पॉईंट ठरू शकेल. म्हणून हृषिकेशला होणाऱ्या या ‘प्रॉफिट’ला ‘घे डब्बल’ म्हटले जाते आहे.

व्यावसायिक सिनेमातील कंटेंटची नवी लाट ‘न्यू वेव्ह’ हृषिकेश बॉईज 2, बच्चन, आश्चर्य-फकीट, येरे येरे पैसा 2, माझा अगडबम अशा सिनेमातून प्रेक्षकांपर्यंत आणतोय. त्यात या नव्या कराराने वेगळे सकारात्मक वळण आले आहे.

summary- writer to get 10 per cent profit first time in marathi