चीनमध्ये देशभक्तांची कमतरता, अखेर जिनपिंग यांनी लागू केला नवीन कायदा

एकापाठोपाठ एक अशा आव्हानांचा सामना करत असलेल्या चीनला आता आणखी एका संकटाने ग्रासले आहे. चीनमध्ये देशभक्तच सापडत नसल्याने आता चीन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चीनमधील जनता आता देशभक्तीला प्राधान्य देत नसल्याचे चीन सरकारला वाटते. लोकांमध्ये देशाप्रती देशभक्तीची भावना नाही, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे आता जिनपिंग यांच्या सरकारने देशभक्तीपर शिक्षण कायदा लागू केला आहे. पुढील आठवड्यापासून चीनमध्ये हा कायदा लागू होणार आहे.

देशभक्तीपर शिक्षण कायद्याचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता वाढवणे आहे. या कायद्यानुसार, लहान मुलांपासून ते कामगार आणि सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षावर विश्वास दाखवावा लागणार आहे. मुलांच्या शाळांमधील अभ्यासक्रमात देशभक्ती कायदाही जोडला जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, या कायद्याचा उद्देश चीनला विचारांनी एकजुट करणे, एक मजबूत देश आणि राष्ट्रीय बदल निर्माण करण्यासाठी एकत्र येणे आहे.