आयफोनसाठी 17 वर्षीय मुलाने विकली किडनी

अॅपल आयफोन एक्स - अॅपल कंपनीचा मास्टरपीस म्हणून ओळखला जाणारा 'अॅपल आयफोन एक्स'मध्ये फेस आयडी रेकग्निशन हे महत्त्वाचे फीचर आहे. हे फिचर लॉक किंवा अनलॉकचं काम करणार असून तुमचा चेहराच तुमच्या मोबाईलचा पासवर्ड असेल.

सामना ऑनलाईन,मुंबई

मोबाईलचे व्यसन लागल्याने तरुण पिढीवर अनेक दुष्परिणाम होत आहेत. मोबाईल खरेदीसाठी लोक काहीही करायला तयार होतात. चीनमधील एका तरुणाने आयफोनसाठी चक्क स्वत:ची किडनी विकल्याची घटना आता उघडकीस आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या जिओ वँग नाकाच्या एका तरुणाने सात वर्षांपूर्वी ‘आयफोन-4’ खरेदी करण्यासाठी स्वत:ची किडनी विकली. ‘आयफोन-4’ ज्यावेळी लाँच झाला तेव्हा जिओ वँग अवघ्या 17 वर्षांचा होता. तेव्हा तो विद्यार्थी दशेत असताना शाळेत आयफोन प्रतिष्ठेचा समजला जात होता. आयफोन घेण्यासाठी जिओ वँग याने किडनी विकण्याचे ठरविले. वँगने एक किडनी 3,200 अमेरिकन डॉलरला (2,23,265 रुपये) विकली. या पैशातून त्याने ‘आयफोन-4’ खरेदी केला. कँग आता 24 वर्षांचा आहे. एक किडनी काढल्यानंतर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. आठवडाभरानंतर तू पूर्वीसारखाच तंदुरुस्त होशील असे वँगला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते, परंतु किडनीची शस्त्रक्रिया करताना दुर्दैवाने त्याला संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या 7 वर्षांपासून तो अंथरुणाला खिळून पडला आहे.