शिओमीच्या रेडमी नोट ४ मोबाईलचा स्फोट

सामना प्रतिनिधी, अमरावती

शिओनी कंपनीच्या रेडमी नोट ४ हा मोबाईल जगभरात गाजत असतानाच हा फोन ज्यांच्याकडे आहे अशा मोबाईलधारकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीच्या खिशात या मोबाईल फोनचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे त्या व्यक्तीचा पाय भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भावना सूर्यकिरण या अमरावतीत राहणाऱ्या तरुणाने महिनाभरापूर्वीच हा मोबाईल घेतला होता. मंगळवारी सूर्यकिरण बाईकवरून जात असताना पॅण्टच्या खिशात ठेवलेल्या त्याच्या रेडमी नोट ४ चा स्फोट झाला. गेल्या महिन्यात गुवाहटी येथेदेखील शिओमीच्या एका फोनचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे.