याकूब मेननच्या मुलीचा 93 बॉम्बस्फोटातील आरोपीच्या मुलाशी निकाह

63

सामना ऑनलाईन । मुंबई

1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेल्या याकूब मेननची मुलगी जुबैदाने याच प्रकरणातील फरार आरोपी अझीझ बिखालियाचा मुलगा अफजलसोबत निकाह केला आहे. शुक्रवारी माहिम येथे त्यांचा हा निकाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे काही नातेवाईक देखील सहभागी झाले होते. असे समजते.

बिखालिया हा दाऊद इब्राहीम याचा खास व्यक्ती होता. 30 वर्षांहून अधिक काळ तो दाऊदसाठी काम करत आहे. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याची महत्त्वाची भूमिका होती. गुजरातमार्गे पाकिस्तानातून आलेला सर्व शस्त्रसाठा बिखालीयानेच अबू सालेम, सलीम हिंगोरा, बाबा मूसा यांच्यापर्यंत पोहोचवला होता व नंतर तो साठा अभिनेता संजय दत्तच्या घरी ठेवण्यात आला होता. 93 च्या बॉम्बस्फोटानंतर अफजल बिखालिया फरार झालाय तो आजपर्यंत हिंदुस्थानच्या हाती लागलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या