दारुबंदीसाठी येल्लोरीच्या महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

14

सामना प्रतिनिधी, औसा

औसा गावात अवैध धंदेवाल्यांनी कहर केला असून गावातील महिलांना वावरणे मुश्कील झाले आहे. आमची लहान मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. याला जाब विचारण्यासाठी गावातील महिलांनी भादा पोलीस ठाणे गाठून गावात चालणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी ठिय्या मांडला.

तालुक्यातील येल्लोरी येथे अनेक वर्षापासून अवैध धंदे जोरात सुरू असून याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या पण पोलिसांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे मिळते सुत असल्याने गावात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी दारू विक्री होत आहे. यामुळे आमच्या मुलाबाळांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे शिवाय पुरुष मंडळी व्यसनाच्या आहारी जात आहे. याला कंटाळून गावातील महिलांनी चक्क 21 फेब्रुवारी 2019 रोजी भादा पोलिस ठाणे गाठून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. यावेळी जवळपास तीस ते चाळीस महिला यावेळी उपस्थित होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या