येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

कैद्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा कारागृहात घडली आहे. सचिन मधुकर नरवाडे (वय 31, रा. तांबे बिल्डींग, बजरंगवाडी, शिक्रापूर, मूळ रा. सावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. याप्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालायाच्या आदेशाने सचिनची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.

न्यायालयीन बंद्यांना गुरुवारी (7 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास मोकळे सोडण्यात आले होते. अर्ध्या तासानंतर कैद्यांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी सचिन नसल्याचे आढळून आले नाही. सचिनने बराक क्रमांक दोनच्या परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.