राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पुणे जिल्ह्याला विजेतेपद

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी

महाराष्ट्र योगा कल्चर असोसिएशन संचलित सिंधुदुर्ग योगा कल्चर असोसिएशन व निरामय प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे रविवारी आयोजित सातव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पुणे जिल्ह्याने विजेतेपद पटकावले. पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांनी विविध गटात सर्वाधिक यश मिळवताना स्पर्धेतील मानाची चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पुणेसह पिंपरी चिंचवड, नाशिक, रत्नागिरी व मुंबई येथील स्पर्धकांनीही विविध गटात पारितोषिके पटकावली.

निरामय प्रतिष्ठानच्या उमा चोगुले व सहकारी यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा मालवण येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भाजप नेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सुयश संपादन केलेल्या पुणे जिल्ह्याच्या संघाला संदेश पारकर यांच्या हस्ते चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी उमा चौगुले, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, आंतराष्ट्रीय पंच चंद्रकांत पांगारे, विजय केनवडेकर, अवधूत मालंडकर, राजन वराडकर, बबन गावकर, शैलेश पावसकर, सुप्रिया गावकर, प्राजक्ता गावकर, तनिष्का कासवकर, प्रिया पावसकर, सौ. मोरजकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेत राज्यभरातील १५ जिल्ह्यातुन ३५० तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० योगापटूंनी सहभाग दर्शविला होता. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुढीलप्रमाणे – गट पहिला- (वय वर्षे ६ ते १०) मुले- ईशान देशमुख (पिंपरी चिंचवड), ध्रुव फाटक (पुणे), ओम चव्हाण (रत्नागिरी). मुली- तन्वी पाटील (पिंपरी चिंचवड), स्वानंदी वालझडे (नाशिक), श्रावणी भोसले (रत्नागिरी) गट दुसरा-(वय वर्षे १० ते १५) मुले- सौरभ कुलक्षे (सातारा), वेदांत अडसरे (नाशिक), प्रणव पितळे (पुणे). मुली- ख़ुशी निडगे (पिंपरी चिंचवड), ऋतुजा पाटील (पिंपरी चिंचवड), रिद्धी वाथीम (रत्नागिरी).गट तिसरा-(वय वर्षे १५ ते २२) मुले- सुशांत तरवडे (पिंपरी चिंचवड), जतिन आव्हाड (पिंपरी चिंचवड), अक्षय माने (पुणे). मुली- श्रेया कंधारे (पिंपरी चिंचवड), प्राजक्ता खवले (मुंबई), प्रतीक्षा पाटील (मुंबई).गट चौथा- (वय वर्षे २२ ते ३०) मुले- संकेत शहा (पिंपरी चिंचवड), संतोष रिंगणे (पुणे), प्रमोद उगाळे(पिंपरी चिंचवड). मुली- स्नेहल खोल्लम, ओनम शर्मा, हेमांगी मेंनवंडकर.गट पाचवा-(वय वर्षे ३० ते ४०) मुले- उत्तम मांढरे (मुंबई), हर्षद नेरे (मुंबई), विष्णू जयस्वाल (पालघर). मुली- वंदना कोरडे (नाशिक), रुपाली तरवडे (पिंपरी चिंचवड), योगिनी देशमुख (पिंपरी चिंचवड).गट सहावा-(वय वर्षे ४० ते ५०) पुरुष- केदार रायरीकर (पुणे), सुनील ढमाले (नाशिक), शिवाजी घोडके (पुणे). महिला- रुपाली वाईकर (पुणे), २.कविता गाडगीळ (सांगली), अर्चना साबळे (पुणे). गट सातवा- (वय वर्षे ५० ते ६५) पुरुष- शंकर कवळे (पुणे शहर), सुनील शिंदे (सातारा), विनायक मुसळे (पुणे शहर). महिला- अलका जाधव, तिलोत्तमा कदम, आशा पालव.गट आठवा- (वय वर्षे ६५ वरील) पुरुष- गजानन कुसुरकर (सातारा), दिलीप भिडे (पुणे शहर), रमेश कुलकर्णी (पुणे शहर).