योगीराज खोंडे यांचे निधन

सामना ऑनलाईन । नगर

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष आणि सरकारी कर्मचारी चळवळीचे आधारस्तंभ योगीराज खोंडे (नाना) यांचे आज (शुक्रवारी) दुपारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

कामगारांमध्ये लोकप्रिय असलेल्या योगीराज खोंडे यांनी कायम कामगारांच्या हितांना प्राधान्य दिले. कारभारातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली.

नेत्रदान

कायम इतरांच्या भल्याचा विचार करणाऱ्या योगीराज खोंडे यांच्या डोळ्यांचे दान करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या नातलगांनी दिली.

अंत्ययात्रा

अंत्ययात्रा आज रात्री ८:३० वाजता ‘पार्वती’ बंगला, गुलमोहोर रोड, अहमदनगर येथून निघेल.