बापरे! २३ वर्षाचा नवरा आणि ९१ वर्षाची नवरी

सामना ऑनलाईन । ब्यूनस आयर्स

लग्न करण्यासाठी आपल्याकडे शक्यतो एकाच वयाचे किंवा वयामध्ये २-३ वर्षांचे अंतर असणारी जोडी पाहायला मिळते. प्रेमाला वयाचे बंधन नसते हे देखील अनेक वेळा कमी अधिक वयाच्या जोडीकडे पाहून म्हटले जाते. मात्र अर्जेटीनामधील एका २३ वर्षांच्या मुलाने आपल्या ओळखीच्याच ९१ वर्षांच्या महिलेसोबत लग्न केले आहे. दोघे काही वर्ष एकत्रही राहिले मात्र आता त्यांच्या लग्नावरून वाद सुरू झाला असून हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

अर्जेटीनामधी माऊरिसिओ ओसौला नावाच्या २३ वर्षाय तरुणाने ओलांदा टारेज नावाच्या एका वृद्ध महिलेसोबत २०१५मध्ये लग्न केले होते. मात्र मागील वर्षी एक जखम सडल्याने ओलांदाचा मृत्यू झाला. माऊरिसिओने ओलांदाच्या निधनानंतर पेंशनसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अधिकाऱ्यांनी माऊरिसिओवर पेंशनसाठी ओलांदासोबत लग्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच लग्नानंतर २४ दिवसांनी मधूचंद्रासाठी गेल्यानंतर ओलांदाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सागितले.

सामाजिक कार्यकर्त्यांनी या लग्नाबाबत माऊरिसिओच्या शेजाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तर, ‘माझे ओलांदावर प्रेम होते. तिच्या मृत्यूमुळे मला अतिव दुख: झाले आहे. तसेच पेंशनसाठी अर्ज करताना मी सर्व कायदेशीर कागदपत्रं जमा केले आहेत,’ असे माऊरिसिओने म्हटले आहे.