तुम्ही कोणती गाणी ऐकता यावरून ठरतं तुमच व्यक्तीमत्व

4

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

टेन्शन घालवायच असेल तर गाणी ऐका असा सल्ला बऱ्याचवेळा मित्र किंवा डॉक्टर देतात. पण हे संगीत फक्त तुमचा मानसिक थकवा घालवत नाही तर तुमचं व्यक्तीमत्वही सांगत असा दावा ब्रिटनच्या एका विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

ब्रिटनमधील फिट्जविलियम विद्यापीठातील संशोधकांनी गाणी आणि व्यक्तीमत्व या विषयावर एक सर्वेक्षण केले. यासाठी त्यांनी २२ वर्षाहून अधिक वयोमानाची तब्बल २०,००० लोकांची निवड केली. ऑनलाईनद्वारे या लोकांच्या गाण्यांच्या निवडीवर लक्ष ठेवण्यात आले. त्यात उमेद असलेले सकारात्नक विचार करणाऱ्या लोकांना उडती गाणी व मनाला उर्जा देणारी गाणी आवडत असल्याचं समोर आलं. तर ज्या लोकांना दर्दभरी, जुन्या आठवणींना उजाळा देणारी गाणी आवडतात ती गंभीर स्वभावाची व वाईट आठवणी कुरवाळणारी असतात असंही संशोधकांना आढळलं. तसेच ज्यांना प्रसंगानुरुप गाणी ऐकायला आवडतात त्यांच्यात मिश्र भावनांचा कल्लोळ असल्याचं संशोधकांनी म्हटल आहे. या संशोधनाचा अहवाल एका मनोवैज्ञानिक वैद्यकिय पत्रिकेतही प्रसिद्ध करण्यात आला असून अनेकजण त्याच्याशी सहमत आहेत.