छुप्या कॅमेऱ्यातून तो बनवायचा तरुणींचे अश्लील व्हिडीओ, प्रेयसी करायची मदत


सामना ऑनलाईन । बेंगळुरू

बेंगळुरू येथील एका 21 वर्षीय तरुणाला अश्लील व्हिडीओ बनवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यात त्याच्या प्रेयसीनेही त्याला मदत केल्याच्या संशय पोलिसांना आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचं नाव सिद्धार्थ असून तो मूळचा तंजावर इथला रहिवासी आहे. तो बेंगळुरू येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रेयसीही तामिळनाडूची आहे. त्याने तिचाही एक व्हिडीओ बनवला होता. त्या व्हिडीओच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत होता. तो तिच्याकरवी मुलींच्या वसतिगृहात छुपे कॅमेरे लावत होता आणि तिच्या मैत्रिणींचे व्हिडीओ काढत होता.

ही घटना एका तरुणीमुळे उघडकीला आली. तिला आपला एक अश्लील व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाल्याचं समजलं. एका फेक प्रोफाईलच्या माध्यमातून तो अपलोड करण्यात आला होता. तिने ताबडतोब पोलिसात धाव घेतली. ही तरुणी सिद्धार्थच्या प्रेयसीसोबतच वसतिगृहात राहत होती. तिला आपली सिद्धार्थची प्रेयसी असल्याचंही माहीत होतं. तसंच या घटनेपूर्वी सिद्धार्थला त्याच्या गैरवर्तनामुळे महाविद्यालयातून काढून टाकण्यात आल्याचंही तिला माहीत होतं. त्यामुळे तिला सिद्धार्थवर संशय आला होता.

पोलिसांनी केलेल्या तपासात या सगळ्यामागे सिद्धार्थ असल्याचं स्पष्ट झालं. त्याने आणखीही काही जणींचे अश्लील व्हिडीओ बनवले होते. तसंच त्यांपैकी एकीच्या आईचाही न्यूड व्हिडीओ सिद्धार्थने बनवल्याचं समोर येत आहे. असे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तो मुलींवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत असल्याचंही पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झालं आहे.

summary- youth arrested for making nude videos