तरुणीच्या फोटो खाली 200 अश्लील कमेंट्स, तरुणाला अटक

11


सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतल्या एका माथेफिरू तरुणाने एका 19 वर्षीय तरुणीच्या फोटो खाली तब्बल 200 अश्लील कमेंट्स केल्या आहेत. तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

सिराज सिद्दीकी या तरुणाचे एका तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली. या ओळखीचे चांगल्या मैत्रीत रुपांतर झाले. नंतर सिराजने तरुणीला प्रेमासाठी विचारले त्यावर तरुणीने नकार दिला. नंतर तरुणाने तरुणीला सोशल मीडियावर त्रास देण्यास सुरूवात केली. तरुणीने त्याला ब्लॉकही केले. परंतु या मजनूने फेक अकाऊंट तयार करून तरुणीच्या इन्स्टाग्रामवर 200 अश्लील कमेंट्स केल्या. या कमेंट्स पाहिल्यानंतर तरुणीने पोलिसांमध्ये धाव घेतली. सदर तरुण इंजिनीअर असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पूर्ण तपास झाल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या