व्हिडीओ: पेट्रोल पंपावरील मोदींच्या पोस्टरला काळं फासलं

815
black-on-modi-face

सामना प्रतिनिधी । संगमनेर

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज 15-20 पैसे वाढवून जनतेला वेड्यात काढायचं काम मोदी सरकार, भाजप सरकार करत आहे, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून संगमनेरमध्ये पेट्रोल पंपांवर गुरुवारी आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका पेट्रोल पंपावर दरवाढीचा निषेध करत मोदींच्या पोस्टरला काळं देखील फासण्यात आलं.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध म्हणून मोर्चे काढण्यात आले. संगमनेरमधील पाच ते सहा पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आली. पुणे-नाशिक महामार्गावरील ऐश्वर्या पेट्रोल पंपावर आज दुपारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान मोदींच्या जाहिरातींना काळे फासत निषेध व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या