कर्जबाजारी शेतकरी मुलाची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । वडवणी

सततची नापीकी नैराश्य बॅंकेचे कर्ज आदी समस्यांनी ग्रासलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात मामला येथील कर्जबारी शेतकरीपुत्र दत्ता अनंत लंगे वय 23 वर्ष याने गेल्या आठ दिवसापूर्वी विष घेतले होते त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार चालू होते मात्र उपचारादरम्यान आज त्याचे निधन झाले.

महाराष्ट्रात कर्जबारीपणा, नैराश्य, शेतीमालाला कमी भाव,नापीकी आदी समस्यांनी शेतकरी आतमहत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अस्मानी संकटासह सुलतानी संकटाचा सामना करताना वडवणी तालुक्यातील शेतकरी पुञ दत्ता अनंत लंगे याने आठ दिवसापूर्वी विष घेतले होते माञ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याचा व वडीलांच्या नावाने भारतीय स्टेट बॅंकेचे अंदाजे एक ते दीड लाखाचे कर्ज होते. एकंदरीतच पाहता सर्व कुटूंबाची हालाखीची परीस्थिती होती. त्याच्या निधनाने संपुर्ण तालुक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे.