नगर जिल्ह्यात युवकास जमावाकडून शस्त्राने बेदम मारहाण


सामना प्रतिनिधी, नगर

घर सोडण्यास सांगितले असतानाही परत गल्लीत आल्याच्या कारणावरुन 8 ते 9 जणांच्या जमावाने एकास शिवीगाळ दमदाटी करीत लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, तलवारीने मारहाण केली. ही घटना नगर जिल्ह्यातील बेलदार गल्ली येथील वाईन शॉपजवळ सोमवारी (दि 7) साडेआठ वाजता घडली.

मजिद मुनीर खान (रा. बेलदार गल्ली) हा पत्नीसह बेलदार गल्ली येथील ससे वाईन दुकानाजवळ थांबलेला असता तेथे एजाज इसहाक शेख, नवेद इसहाक शेख, सवलेन अल्ताफ शेख, सालेकिन जबीर शेख, इरफान शेख व अन्य चार अनोळखी इसमांनी आम्ही इरफान इसहाक शेखकडून आलो त्यांनी तुला घर सोडून दे असे सांगितले, तरी तू गल्लीत परत आला असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्यानी व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच तलवारीने हातावर मारुन जखमी केले व कुटुंबासह मारुन टाकण्याची धमकी दिली.या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सणस हे करीत आहेत.