सख्या भावांनी केला युवकाचा खून

1

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

मागील भांडणाच्या वादातून दोन सख्या भावांनी एका युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री शहरात घडली. या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव अयुब उस्मान सय्यद ४५ असे असून या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

शहनाज अयुब सय्यद रा. पाथर्डी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, नगर रोड लगत असलेल्या जानपीर बाबा दर्ग्याची पूजा कोणी करावी या व मागील भांडणाचा राग धरून या घटनेतील आरोपी समद सालद सय्यद व शकुर सालद सय्यद या दोघा भावांनी अयुब उस्मान सय्यद याला काठीने मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने येत्या २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पो. उप. निरी. वैभव पेटकर हे करत आहेत.