गेटवे लिटफेस्टमध्ये युवा साहित्यिकांचा मेळा, 22 भाषांमधील साहित्यिकांचा सहभाग

20


सामना प्रतिनिधी, मुंबई

हिंदुस्थानातील साहित्यातील युवा शक्तीचा अनुभव यंदा गेटवे लिटफेस्टमध्ये घेता येणार आहे. येत्या 1 आणि 2 मार्च रोजी एनसीपीए येथे लिटफेस्ट रंगणार आहे. यामध्ये 22 भाषांमधील 60 साहित्यिक सहभागी होणार आहेत. साहित्य अकादमी युका पुरस्कार किजेत्या 40 किजेत्यांचा सहभाग हे यंदाच्या लिटफेस्टमधील आकर्षण असेल.

गेटके लिटफेस्ट (जीएलएफ) हा पॅशन 4 कम्युनिकेशन आणि मल्याळी भाषिक तिमाही काक्का यांच्या संयुक्त किद्यामाने आयोजित केला जातो. दोन दिकसीय लिटफेस्टमध्ये 12 सत्रे होतील. लिटफेस्टमध्ये साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्यासह पॉल झचारिआ, पेरुमल मुरुगन, रंजित होस्कोटे, मनू पिलाई, एस. हरीश, हेमंत दिकटे, रामू रामनाथन, एजे थॉमस, संगीता श्रीनिकासन, लोपा, सूर्या गोपी, अनामिका हस्कर आणि शोभा डे आदी कक्ते असतील. लिटफेस्टचे सल्लागार अदूर गोपालकृष्णन, प्रतिभा रे, सच्चिदानंदन, सितांशू यशच्चंद्र, सुबोध सरकार, सचिन केतकर, लक्ष्मण गायककाड आणि एस. प्रसन्नरंजन चित्रपट, नाटक आणि काक्य याकरील सत्रांमध्ये आपले विचार मांडतील.

अमेरिकेचे मेंदू मुंबईत
अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूल संलग्न मॅकलिन रुग्णालयाने वरळीचे नेहरू विज्ञान केंद्र आणि डॉ. वहिया फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘मेंदू आणि मानसिक आजार’ या विषयावर नेहरू विज्ञान केंद्रात प्रदर्शन आयोजित केले आहे. अमेरिकेत पाच वर्षांपूर्वी ब्रेन डेड झालेल्या रुग्णांचे जतन केलेले मेंदू प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनाला सोमवारी क्रिकेटपटू शेन वॉर्न याने भेट दिली. फिरकी गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना गोंधळवून टाकणाऱया शेन वॉर्नला हजारो वाहिन्यांची गुंतागुंत असलेल्या मानवी मेंदूचा खराखुरा नमुना हाती घेण्याचा मोह यावेळी आवरला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या