मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर फेकली चप्पल, युवकाला अटक


सामना ऑनलाईन । पाटणा

पाटण्यात कार्यक्रमादरम्यान एका युवकाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर चप्पल फेकली आहे. जनता दल (सं) च्या कार्यक्रमात हा हल्ला झाला असून संबंधित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पाटण्यात पक्षाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आले होते. तेव्हा चंदन नावाच्या एका युवकाने त्यांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ही चप्पल त्यांना न लागता फक्त मंचापर्यंत पोहोचली. पोलिसांनी तत्परता दाखवत चंदनला अटक केली.

चंदन तिवारी हा सवर्ण सेनेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक  माहिती आहे. आरक्षणाचा निषेधार्थ त्याने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.