स्टाइल…. कर्तृत्वाची! धूम्रपान… नकोच!

2

सामना ऑनलाईन । मुंबई

सिगारेट ओढणं… बोलीभाषेत Smoking हे आजच्या तरुणाईचे उगीचच स्टाइल स्टेटमेंट आहे. बरीच तरुणाई विनाकारण याच्या आहारी जाताना दिसते. स्टाइल स्टेटमेंटसाठी अनेक चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, ज्यामुळे खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व उजळून निघेल… पाहूया यावर आजच्या तरुणाईची मतमतांतरे…

धूम्रपानाला स्टाइल-पॅशन समजण्याचा मूर्खपणा नको
आज तरुणाईमध्ये व्यसन हे फॅशन होतेय. मित्रांच्या संगतीचा परिणाम, चित्रपटांमध्ये दाखकणाऱ्या नटांची नक्कल म्हणून ही सवय अलीकडच्या तरुणांच्या आयुष्यात प्रकेश करते. तीच मग त्यांचा घात करते. व्यसनाच्या आहारी जाणे हे मानसिक कमकुवतेचे एक लक्षण आहे. गल्लीबोळात उघडलेल्या पानाच्या टपऱ्या, तिथे जमणारे तरुणांचे घोळके हे द्योतक आहे काढत्या धूम्रपानाचे. ज्या वयात शरीर कमकायचे असते त्या वयात धूम्रपान करून शरीर गमावण्याचे काम तरुण करत आहेत. त्यामुळे तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धूम्रपान आयुष्य खराब करते म्हणून त्याला स्टाइल आणि पॅशन समजण्याचा मूर्खपणा तरुणांनी करू नये. मोहिनी मुश्रीफ, मुंबई किद्यापीठ

छाप पाडायची तर कर्तृत्वाची पाडा…
सिगारेट ओढणे हा तरुणाईचा सध्या ट्रेण्ड बनलाय. आजची तरुणाई रस्त्यावर उभे राहून सिगारेटचे झुरके सोडत असते. त्यांना कसलीच तमा नसते. आपल्याकडे तरुणाईवर चित्रपटांचा फार प्रभाव होताना दिसतो. चित्रपटाच्या सुरुकातीला ‘धूम्रपान करना मना है’ अशी जाहिरात दाखवली जाते. परंतु यानंतर त्याच चित्रपटामध्ये धूम्रपान व मद्यपान करताना दाखवले जाते. तशी खरंच गरज असते का? म्हणजे एखादा गुंड किंवा हिरो दाखवायचा असेल तर तो सिगारेट ओढतानाच दाखवायला हवाय का? एकीकडे धूम्रपान आरोग्यासाठी घातक आहे अशी जनजागृती करायची आणि दुसरीकडे चित्रपटांमध्ये अभिनेते धूम्रपान करताना दाखवून आणि खाली ‘धूम्रपान करना मना है’ असा संदेश द्यायचा हे कितपत योग्य आहे. स्टाइल आणि सिगारेट ओढणे या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही. स्टाइल करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत आणि एखाद्यावर छाप पाडायचीच असेल तर ती स्वतःच्या कर्तृत्वाची पाडा. सिगारेट आरोग्यासाठी घातक आहे आणि त्यापासून जेकढे लांब राहत येईल तेवढे आरोग्यासाठी चांगले राहील. – जनार्दन येडगे, हिंदुजा कॉलेज (जर्नालिझम) माजी किद्यार्थी

धूम्रपान हा स्टाइलचा भाग

खरं तर सिगारेट ओढणं हे आरोग्यासाठी हानिकारकच… पण हे माहीत असूनही अनेक तरुण सर्रास धूम्रपान करतात. याचं कारण म्हणजे सध्या धूम्रपान हे स्टाइलचा भाग बनले आहे. चित्रपट यामध्ये अजून भर घालत असतात. जी गोष्ट धोकादायक आहे अशा गोष्टी स्टाइलचा भाग बनवण्यापेक्षा या गोष्टी कशा घातक आहेत याच्या प्रचारावर जोर दिला पाहिजे. कारण या देशाची धुरा भकिष्यात ज्या तरुणांच्या हाती जाणार आहे ती तरुण पिढी व्यसनाधीन होणे हे देशासाठी घातक आहे.
– प्रथमेश गीते, राज्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ