कल्याणचा युसूफ खान इसिसमध्ये दाखल

सामना ऑनलाईन । कल्याण

कल्याणच्या बैलबाजार परिसरातील युसूफ खान इसिस या दहशतवादी संघटनेत दाखल झाला आहे. मागील सहा महिन्यांपासून युसूफ बेपत्ता होता. या पार्श्वभूमीवर त्याच्या अम्मीनेच युसूफचे ‘इसिस’सोबतचे कनेक्शन जाहीर केले आहे.

बेपत्ता युसूफला शोधण्यासाठी त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीआधारे तपास सुरू असताना एटीएसला युसूफ अख्तर शेख ‘इसिस’च्या संपर्कात असल्याचे ठोस पुरावे मिळाले. युसूफची आई फातिमा हिने मुलाला नमाज पठणाचे वेड लागले होते असे सांगितले. युसूफ स्क्रिझोफेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, असेही ती म्हणाली.

युसूफ ११ मे २०१६ रोजी बेपत्ता झाला होता. आता त्याचे ‘इसिस’सोबतचे कनेक्शन पोलिसांना समजले आहे.