युसूफ पठाणला हाँगकाँग टी-२० लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाही

मुंबई – हिंदुस्थानचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण हाँगकाँग टी-२० लीगमध्ये खेळू शकणार नाही. कारण हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला त्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली नाही. याआधी युसूफ पठाण म्हणाला होता की, मला हाँगकाँग टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी ‘बीसीसीआय’कडून ‘एनओसी’ मिळाली आहे, मात्र आपण युसूफला ‘एनओसी’ दिली नसल्याचे ‘बीसीसीआय’ने सांगितले आहे. युसूफला हाँगकाँग लीगसाठी ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निमंत्रित केले होते. त्यामुळे तो या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक होता, मात्र आता हा विषय संपला आहे.