भुशी लोणावळा येथील खाजगी आयटीआय संस्थेला युवा सेनेचा दणका

2

सामना प्रतिनिधी । लोणावळा

मावळ लोकसभा युवा सेना विस्तारक,मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी भुशी येथील इंडिया स्पॉन्सरशिप कमेटी या खाजगी आयटीआय संस्थेला युवा सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या फी मध्ये गणवेशाचा समावेश असूनही विद्यार्थ्यांचे कोर्सेस संपत आले तरी अजून गणवेश देण्यात आले नाहीत. तसेच कोर्सेस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले डिपॉझिटही परत देण्यात आले नाही.या प्रश्नांसंदर्भात आयटीआयच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. या संबंधी युवा सेना व संस्थेची संयुक्त बैठक घेऊन संस्थेच्या वतीने हे प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे,भारतीय विद्यार्थी सेना वाकसई विभाग संघटक नितिन देशमुख,कुसगाव विभाग युवती सेना अधिकारी काजल शेख,युवती सेना उपविभाग अधिकारी स्नेहल शेवाळे,भारतीय विद्यार्थी सेना विभाग संघटक तारिश रानवे,वाकसई युवा सेना शाखा अधिकारी रोशन येवले,निखिल चांदणे हे उपस्थित होते.