युवासेनेच्या शाखा युवा अधिकारी पदासाठी मुलाखती

सामना प्रतिनिधी, मुंबई

दहिसर, बोरिवली, मागाठाणे, चारकोप, कांदिवली (पू) आणि मालाड (प) विधानसभेतील युवासेना पदांसाठी नेमणुका करण्यात येत असून युवासेनेच्या शाखा युवा अधिकारी पदाकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत.

युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता समता विद्यामंदिर हॉल, समता नगर, कांदिवली (पू) या ठिकाणी या मुलाखती होणार आहेत, असे युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून सांगण्यात आले आहे.