युवासेनेकडून आठवडी बाजारात कापडी पिशव्याचे वाटप

सामना प्रतिनिधी । धाराशिव

शासनाच्या प्लॅस्टीक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करीत युवासेनेच्या वतीने रविवारी शहरातील आठवडी बाजारात ६०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

सरकारकडून २३ जून पासून राज्यात प्लॅस्टीक बंदी करण्यात आली आहे. या निर्णयाचे येथील युवासेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून रविवारी धाराशिव येथील आठवडी बाजारात नागरीकांना ६०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हायुवा अधिकारी तथा उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, नगरसेवक रवि वाघमारे, सिध्देश्वर कोळी, गणेश आसलकर, कमलाकर दाणे, कुणाल धोत्रीकर, मंगेशसिंह काटे, अभिजीत जेवे, सह्याद्री राजेनिंबाळकर, संतोष देवकते, नितीन दंडनाईक, तारामती मोरे, सागर कदम, अविनाश तपटे, अविनाश ईटकर, महेश देवकते, पिंटू देवकते आदीसह पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.