
सामना प्रतिनिधी । सोलापूर
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सोमवारपासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहाणी त्यांनी केली. आदित्य ठाकरे पोखरापूर येथील तलावाची पाहाणी केली. याभागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.