पतंगराव कदम महाविद्यालयात युवासेनेची स्थापना

सामना प्रतिनिधी । पेण

पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालयात तालुका अधिकारी चेतन मोकल यांच्या पुढाकाराने कॉलेज कक्ष युनिटचे सुरू करण्यात आले. या युनिटचे उदघाटन युवासेना सचिव तथा कॉलेज कक्षप्रमुख वरूण सरदेसाई व शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा पेण पंचायत समिती सदस्य नरेश गावंड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लोचन धर्माजी मोकल याची युवासेना पेण तालुका कक्षप्रमुखपदी नेमणूक झाल्याची घोषणा वरुण सरदेसाई यांनी केली. यावेळी पेण मधील अनेक तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमाला शिवसेना पेण तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, युवासेना पेण विधानसभा अधिकारी सुधीर ढाणे, पेण शहरप्रमुख ओंकार दानवे, पेण शहर अधिकारी प्रसाद देशमुख, युवासेना तालुका चिटणीस राकेश मोकल, शिवसेना महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, गीता म्हात्रे, वैशाली बामणे, सचिन गोरडे, राजेंद्र वाळज, प्रसन्न नेमाणे, शरद शिंदे, निलेश शिंदे आदींसह शिवसैनिक युवासैनिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.