लातूर : आदित्य ठाकरेंचा दुष्काळ दौरा, शेतकऱ्यांशी साधला संवाद

30


सामना ऑनलाईन । लातूर

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचे लातूर येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार दिनकर माने, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, युवा सेनेचे सहसचिव तथा जिल्हा विस्तारक प्राध्यापक सुरज दामरे, कार्यकारणी सदस्य सिद्धेश कदम यासह असंख्य शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दुष्काळ दौऱ्यादरम्यान लातुर जिल्ह्यातील बुधोडा येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप केले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या टाकीचे लोकार्पण केले.

आपली प्रतिक्रिया द्या