‘षटकारकिंग’ फुटबॉलच्या प्रेमात

सामना प्रतिनिधी, मुंबई

षटकारकिंग क्रिकेटर युवराज सिंग बुधवारी लॉरेस स्पोर्टस् फॉर गुडचे बॅण्ड ऍम्बेसेडरपद स्वीकारण्यासाठी मुंबईत आला होता. मर्सिडिझ बेन्झ इंडियाच्या सहकार्याने लॉरेस स्पोर्टस् फॉर गुड झोपडवासीय गरीब, अनाथ मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा विकासाला मदत करणार आहे. लॉरेसच्या उपक्रमात कुलाब्याच्या कुपरेज मैदानावर शाळकरी मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटण्याचा मोह युवराजलाही आवरला नाही. नाझ फाऊंडेशन, स्लम सॉसर, ऑस्कर व युवा या सेवाभावी संस्थांच्या मदतीसाठी मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.