सिंधुदुर्गात बंदचा परिणाम नाही: सर्वकाही सुरळीत

सामना प्रतिनिधी । कुडाळ

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात सोमवारी पुकारलेल्या हिंदुस्थान बंदचा सिंधुदुर्गात कोणताही परिणाम दिसून आला नाही. बाजारपेठांसह सर्वच व्यवहार, वाहतुक सेवा, शाळा, कॉलेज सुरू होती.

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे सर्व सामान्य जनता होरपळुन निघत आहे. त्यामुळे या दरवाढी आणि केंद्र सरकार विरोधात काँग्रेसने हिंदुस्थान बंदची हाक दिली होती. मात्र या बंदचा कोणताही परिणाम जिल्ह्यात झाला नाही. गणेशचतुर्थी सण तोंडावर आला असुन खरेदीसाठी ग्रामस्थ बाजारपेठांमध्ये दाखल झाले होते. बाजारपेठांसह, वाहतुक सेवा सर्व प्रकारचे व्यवहार सुरळीत सुरू होते.