अभिनेत्री भारती सिंग हर्षसोबत घेणार सातफेरे

सामना ऑनलाईन । मुंबई

छोटय़ा पडद्यावरील प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग हिने तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड हर्ष लिंभाछिया याच्यासोबत सातफेरे घेण्याचे निश्चिंत केले असून नुकताच त्यांचा साखरपुढा समारंभ दणक्यात साजरा झाला.

रविवारी अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये खाजगी कार्यक्रमात त्यांचा ‘रोका’ (साखरपुढा) जल्लोषात पार पडला. भारतीच्या रोका सेरेमनीला तिचा सहकलाकार कृष्णा अभिषेक व त्याची गर्लफ्रेंड कश्मीरा शाह उपस्थित होते.

भारती ही तिचा कार्यक्रम ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ चा लेखक हर्ष लिंभाछिया याच्यासोबत गेल्या दोन वर्षापासून डेट करत आहे. या दोघांनीही कधीही उघडपणे त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही. मात्र दोघंही सोशल मिडीयावरुन कायम एकमेकांसोबतचे फोटो शेअर करायचे. तसेच कॉमेडी नाईट्सच्या सेटवर देखील ते नेहमी एकत्र यायचे.